मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांंनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांंना पत्र लिहिले आहे. अलिकडेच आपण खाजगी सेवेतील डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली, ही मंंडळी प्रशंसनीय काम करत आहेत मात्र राज्य सरकारकडुन त्यांंना मिळणारी वागणुक की मन विषण्ण करणारी आहे असे राज यांंनी पत्रात नमुद केले. काही दिवसांंपुर्वी केंद्र सरकारच्या हवाल्याने महाराष्ट्र सरकारचं एक परिपत्रक आलं होतंं ज्यात कोरोना काळात खाजगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी सगळ्यांना विम्याचं कवच असेल आणि जर ह्यांपैकी कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ह्या विम्यातून 50 लाख रुपये दिले जातील असे सांंगण्यात आले होते मात्र आता डॉक्टर या विम्याची विचारणा करत असताना राज्य सरकार विमा देण्यास नकार देत आहेत. तरी उद्धव ठाकरे यांंनी याप्रकरणात लक्ष घालावे अशी विनंंती राज यांंनी पत्रातुन केली आहे.
राज यांंनी पुढे पत्रात म्हंंटलेय की, कोरोना पसरू लागताच राज्य सरकारने सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालयं, पॅथॉलॉजी लॅब्स ह्यांना नियमित सेवा सुरु ठेवण्यास सांगितले होते, त्यानुसार,या वैद्यकीय कर्मचार्यांंनी रुग्णांची सेवा सुरु ठेवली. पण आता आपलंं वचन न पाळत खाजगी सेवेतील डॉक्टरचा कोरोना मुळे मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे.
राज ठाकरे यांंचे उद्धव ठाकरे यांंना पत्र
#लढाकोरोनाशी #अग्रणीयोद्धा #विमायोजना #मनसेभूमिका #MaharashtraFightsCorona #CoronaWarriors #Frontliners #doctors #insurance pic.twitter.com/alKifF8bFR
— Raj Thackeray (@RajThackeray) September 14, 2020
दरम्यान राज्य सरकार कोणत्या न्यायाने केंद्र सरकारच्या योजनेनुसार द्यायचा फायदा नाकारत आहे? ह्याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? असे प्रश्न करत पुढे राज यांंनी मुख्यमंंत्र्यांनी खाजगी किंंवा सरकारी सर्व सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यांंच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.