Diwali 2018 : बलिप्रतिपदा विशेष व्यंगचित्रातून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा
राज ठाकरे व्यंगचित्र photo credit : PTI

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होणारं दुर्लक्ष पुन्हा अधोरेखित केलं आहे. दिवाळी पाडव्याला महाराष्ट्र सरकार मधील प्रमुख नेते उद्धव  ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना ओवाळत आहे. आणि ओवाळणीच्या स्वरूपात पुढील वर्षी येणाऱ्या मतदानाचं दान मागितलं जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र त्यांना ओवाळणीमध्ये दमडी देखील देऊ नका असे दटावत असलेली शेतकऱ्याची बायको देखील राज ठाकरेंनी रेखाटली आहे.

यंदा निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. कर्जमाफी, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, त्यांचे आत्महत्या करण्याचं प्रमाण हे सारं दिवसेंदिवस भीषण होत आहे. मात्र महाराष्ट्र सरकार पुन्हा मतांचा जोगवा मागण्यासाठी येणार या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बलिप्रतिपदे दिवशी हे व्यंगचित्र रेखाटलं आहे.

nbsp;

यंदा दिवाळीच्या दिवसात राज ठाकरेंनी प्रत्येक दिवशी एक असं दिवाळी विशेष व्यंगचित्रांची मालिका सादर करणार असल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या राज ठाकरेंनी यंदा त्याचा वापर करून व्यंगचित्रांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.