Raigad Car And Container Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी
Accident PC PIXABAY

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहनं बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहनं बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.  (हेही वाचा - Pune Porsche Crash Inside Story: 110 च्या स्पीडने आदळली पोर्श, पोलिसांकडूनही घडल्या चुका; पुणे अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची माहिती)

या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण किरकोरळ जखमी झाले. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना तात्काळ खोपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अपघातामधील दोन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ही दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कारने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. स्वप्निल प्रदीप खरबडे असे मृत तरुणाचे नाव आहे. स्वप्निल भोसरीतील लांडेवाडीमध्ये राहत होता. आर्मी स्कूलच्या समोर ही अपघाताची घटना घडली होती.