Rahul Gandhi in Parbhani: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज परभणी (Parbhani) दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांचा हिंसक निदर्शनांनंतर अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. 10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकावरील डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ परभणीत हिंसाचार झाला होता.
न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू -
निदर्शनांमुळे जाळपोळ, दगडफेक आणि सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तथापी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता विजय वाखोडे यांचाही अशांततेदरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेचं तापले आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. तथापी, हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडफोड आणि त्यानंतर झालेल्या निदर्शनांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेप्रकरणी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले आहे. (हेही वाचा -Sharad Pawar Discusses With Devendra Fadnavis: बीड आणि परभणीच्या घटनांबाबत शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा; तत्वरीत कारवाईची केली मागणी)
राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट, पहा व्हिडिओ -
Maharashtra: Lok Sabha LoP Rahul Gandhi visits Parbhani, where he met with the family of Somnath Suryavanshi, who was the deceased accused in the Parbhani violence pic.twitter.com/bRShGoW4Xr
— IANS (@ians_india) December 23, 2024
काय आहे नेमक प्रकरण?
परभणी रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ बंदच्या निषेधार्थ शहरात हिंसाचार झाला. पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. तथापी, अशांततेदरम्यान आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय वाखोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख यांच्या कुटुंबास शरद पवार यांची भेट, उचलली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी)
शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा -
दरम्यान, मागील आठवड्यात शरद पवार यांनी सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. पवार यांनी परभणीतील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. तथापी, त्यांनी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या मृत्यूसंदर्भात तात्काळ कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.