Pune Shocker: पुण्यात नणंद आणि तिच्या मुलांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; गुन्हा दाखल, तपास सुरु
माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वर्षा तुकाराम रणदिवे (35) असे आहे. याप्रकरणी तिचे पती तुकाराम नामदेव रणदिवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी उज्ज्वला ही तुकारामची बहीण आहे आणि तिचा विवाहित मुलगा योगेश आणि त्याच्या कुटुंबासह ती तुकारामच्या शेजारी राहते.
पुण्यातील धनकवडी परिसरातून आत्महत्येची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 35 वर्षीय विवाहित महिलेने नणंद आणि तिच्या मुलांच्या त्रासाला कंटाळून निराश होऊन आपले जीवन संपवले. ही घटना 9 मे रोजी घडली, मात्र या प्रकरणाबाबत 31 मे रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उज्ज्वला बागाव (वय 53), भाचा योगेश बागाव (वय 35), भाची वैशाली बागाव (वय 32) आणि सुवर्णा बागाव (वय 25) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वर्षा तुकाराम रणदिवे (35) असे आहे. याप्रकरणी तिचे पती तुकाराम नामदेव रणदिवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी उज्ज्वला ही तुकारामची बहीण आहे आणि तिचा विवाहित मुलगा योगेश आणि त्याच्या कुटुंबासह ती तुकारामच्या शेजारी राहते. उज्वला तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली आणि सुवर्णा हे अनेक दिवसांपासून वर्षा यांना टोमणे मारून त्यांचा छळ करत होते. (हेही वाचा: Urban Dowry Harassment Cases: केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही हुंड्यासाठी महिलांचा छळ; मुंबई-पुण्यात वाढली प्रकरणे)
याकॅह वर्षा यांनी अनेकदा विरोध केला होता. याआधी निराश होऊन त्यांनी पोलीस तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, यावेळी त्रास सहन न झाल्याने त्यांनी आपला ताबा गमावला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल गौड यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, मुख्य आरोपी उज्ज्वला आणि योगेशला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यानुसार कारवाई केली जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

