Pune Shocker: अल्पवयीन मुलीचे खाजगी फोटो Instagram वर पोस्ट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई मध्ये एका किशोरवयीन मुलाला अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) शनिवार 8 जानेवारी दिवशी मुंबई (Mumbai)  मधून एका किशोरवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तो एका अल्पवयीन मुलीला त्रास असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यांची ओळख इंस्टाग्रामवर (Instagram) झाली होती. यश भंडारे (19 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. यशने अल्पवयीन मुलीसोबत चॅट करता करता तिचे खाजगी फोटो मिळवले असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित प्रकरणामध्ये तो मुलीला धमकावत फोटो फेक इंस्टाग्राम अकाऊंट वर सर्क्युलेट करणार असल्याचं सांगत आहे. असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तामध्ये सांगितले आहे.

मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात धाव घेतली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. तांत्रिक ज्ञान आणि अद्यावत तंत्रज्ञानाची मदत घेत आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला आणि तो मुंबई मध्ये असल्याचं समोर आलं आहे. पुण्याहून मुंबईत पोलिसांनी येऊन भंडारेला अटक केली आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai Cyber Crime: महिलेचा फोन हॅक करत Private Photos वरून ब्लॅकमेलिंग करणार्‍या पुरूषाला पुण्यात अटक .

दरम्यान पोलिसांनी आयपीसी च्या सेक्शन 354 (d), 506 and 34 कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सोबतच Prevention of Children from Sexual Offences Act (POCSO) आणि Information Technology Act अंतर्गत देखील कारवाई केली आहे.