
Pune Temperature: पुण्यातील विविध भागात मंगळवारीही तीव्र उष्णता ( Pune Heat) जाणवत आहे. लोहगाव येथे तापमान 42.7 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. हे तापमान या वर्षातील उच्चांकी तापमान आहे. सोमवारी उष्णता 42.4 अंश सेल्सिअस होती. आता उन्हीळा सुरू झाल्याने दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरमध्येही चालू वर्षातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. उन्हाळा नीट सुरू होण्याआधीच तापमानाने पहिल्यांदाच 41 अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला. पुण्यातील भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, कोरेगाव पार्क (41.4), पाषाण (40.6), चिंचवड (40.3), मगरपट्टा (39.6), एनडीए (39.5) आणि लवळे (39.4) यासह इतर अनेक परिसरांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.
"सध्याचा हवामान गुरुवारपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे," असे आयएमडी-पुणे येथील हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप म्हणाले. "शुक्रवारपासून वाऱ्याच्या दिशेत होणारा बदल दक्षिण भारतातून काही प्रमाणात आर्द्रता आणू शकतो. ज्यामुळे कमाल तापमान थोडे कमी होऊ शकते." असे हवामान तज्ञांनी म्हटले आहे. Mumbai Temperature: फेब्रुवारी महिन्यात मुंबईत जवळजवळ 40 अंश सेल्सिअस तापमान; निर्माण झाल्या एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेबद्दल चिंता
तज्ञांच्या मते, सध्या आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहील. दिवसाचे तापमान उच्च आणि रात्री तापमान उबदार राहील. अद्याप पुण्यासह, इतर भागात औपचारिक उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्रातील इतर भागातही अशीच परिस्थिती आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, अकोला हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण होते. तेथे 44.1 अंश सेल्सिअस तापमान होते.
हवामानशास्त्रज्ञांनी रहिवाशांना भरपूर पाणी पीण्याने आवाहन केले आहे. आवश्यकता नसल्यास दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. सैल, कॉटन कपडे घालावेत असेही सांगितले आहे.