Rains | Representational Image (Photo Credits: PTI)

पुणे शहरामध्ये बुधावार (25 सप्टेंबर) रात्री अचानक झालेल्या ढगफुटीनंतर पुण्यासोबतचा बारामती, भोर परिसरामध्ये पुराचा वेढा पडला आहे. अवघ्या काही क्षणात पुणेकरांनी त्यांच्या डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झाल्याचं दृश्य पाहिलं आहे. पुणे, बारामतीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये मृतांच्या आकड्यामध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता झाले आहेत. पुण्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक सोसायटींमध्ये पावसाचं पाणी घुसलं आहे. तर सहनगर परिसरामध्ये भिंत कोसळल्याची दुर्घटना देखील समोर आली आहे. प्रशासनाने 8 मृतदेह पुणे शहर परिसरातून तर 3 मृतदेह खेड-शिवपूरमधधून काढले आहेत. Pune Rain: पुणे, बारामती मध्ये पावसाचा हाहाकार; नागरिकांनी शेअर केले पावसाच्या रौद्ररूपाचे व्हिडिओज आणि फोटोज

पुणे शहराप्रमाणेच बारमतीदेखील अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. . पुणे शहर आणि परिसरात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. 27, 28 सप्टेंबरलाही गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बारामतीमध्ये नाझरे धरणातून 50 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदी काठच्या भागात नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले अहे. पुणे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 14,000 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

ANI Tweet

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सरकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग पूराच्या स्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. NDRF पथक त्यांच्या 4 तुकड्यांसह विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आणि पूरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रशासन मदत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.