
Pune Crime: पुण्यातील 29 वर्षीय तरुणाला अवघ्या काही मिनिटांत दोनदा लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात 20 जुलै रोजी एका व्यक्तीने आपला मोबाईल फोन आणि दुचाकी चोरल्याची घटना घडली होती. मदतीच्या नावाखाली दोन्ही वेळेस माणूसाला फसवून गेला अशी विचित्र घटना घडली आहे. आधी दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने त्याची मदत घेतली, तर नंतर पीडितेने दुसऱ्या व्यक्तीला मदत मागितली. दोन्ही वेळीस त्याला फसवून फोन आणि बाईक पळवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपींपैकी एकाने आधी घरी फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन पळ काढला आणि नंतर पीडीत व्यक्ती चोरीच्या मोबाईलची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनकडे जात असताना दुसरा आरोपी त्याला मदत करण्याच्या बहाण्याने त्याची दुचाकी घेऊन पळून गेला. पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात तक्रार दिल्यावर ही घटना ऐकताच पोलिसही चक्रावले आहे. पुण्यात चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात चोरीच्या प्रश्नावर खळबळ उडाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराकडे त्याच्या घरी फोन करण्यासाठी मदत मागितली आणि त्याच्याकडे स्वतःचा मोबाईल फोन नसल्याचा दावा केला. तक्रारदाराने चांगल्या हेतूने त्याला त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन दिला. मात्र मदत मागणारा चोरटा असल्याने हुलकावण्या देवून तो मोबाईल घेऊन पळून गेला. या घटने बाबत तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्याचा पत्ता शोधण्यासाठी पीडितेने जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीशी संपर्क साधला.त्या व्यक्तीने त्याला मदतीचे आश्वासन दिले आणि सांगितले की तो स्थानिक पोलिस स्टेशनमधील अनेक पोलिसांना ओळखतो.
त्या बदल्यात त्याने पीडितेला त्याच्यासाठी सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र, पीडित तरुण सिगारेट घेण्यासाठी जवळच्या दुकानात पोहोचताच आरोपीने दुचाकीसह पळ काढला. पीडितेने नंतर त्याचा फोन तपासला आणि त्याला कळले की त्याचा मोबाईल घेऊन पळून गेलेल्या व्यक्तीने यूपीआय व्यवहाराद्वारे 3,000 रुपये ट्रान्सफर केले होते.पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 406 आणि 420 अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.