10 ते 17 जानेवारीदरम्यान रंगणार Pune International Film Festival चा सोहळा
संग्रहित - संपादित प्रतिमा

Pune International Film Festival : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने होणारा 17 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) 10 ते 17 जानेवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा चित्रपट मोहत्सव भारतातील महत्वाच्या मोहोत्सवांपैकी एक मानला जातो. देशविदेशातील उत्कृष्ट चित्रपट पाहण्याची संधी या मोहोत्सावात मिळते. ‘In Search of Truth- Celebrating the 150th birth anniversary of Mahatma Gandhi’ ही यावर्षीची थीम असणार आहे. चित्रपटांबरोबरच विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही समावेश महोत्सवात असेल, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

जागतिक स्तरावरही पिफने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे, म्हणूनच 114 देशांमधून 1634 चित्रपटांच्या एन्ट्री यावर्षी आल्या होत्या. त्यापैकी विविध विभागांतून 150 पेक्षा अधिक चित्रपट या मोहोत्सवात पाहता येणार आहेत. यावर्षी महात्मा गांधी यांच्या जीवनावरील आणि शिकवणीवरील काही जागतिक दर्जाचे चित्रपट महोत्सवामध्ये पाहता येतील. लवकरच चित्रपटांचे वेळापत्रक जाहीर होईल.

या महोत्सवातील चित्रपट पाहाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि फिल्म क्लबचे सदस्य यांच्यासाठी 600 तर इतरांसाठी 800 इतकी फी आकारण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड मंगला आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पाहू शकता.