प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook)

लोकांचे एक महत्वाचे मनोरंजनाचे साधन एफएम रेडिओ काही तांत्रिक बिघाडांमुळे बंद पडला आहे. यामध्ये रेड एफएम (93.5 Red FM) आणि रेडिओ मिरची ( 98.3 Radio Mirchi) यांचादेखील समावेश आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नेटवर्कमध्ये असलेल्या बिघाडामुळे रेडिओच्या प्रसारणात अडथळा आला आहे. फक्त सरकारी रेडिओ चॅनेल्स आकाशवाणी (Akashvani ) - 100.1, रेडिओ 102.8 आणि रेडिओ 107.1 व्यवस्थित कार्यरत आहेत.

सध्या मुंबईमध्ये तब्बल सोळा रेडिओ स्टेशन आहेत, यापैकी बारा स्टेशन एफएम बँडमध्ये प्रसारित केली जातात. यातील सरकारद्वारे चालविण्यात येणारे तीन चॅनेल्स अॅम्प्लिट्यूड मॉड्युलेशन (एएम) मेडियम व्हेव (मेगावॉट) बँडवर प्रसारित केली जातात. मात्र आज अचानक एफएम बँडवर प्रसारित होणारी स्टेशन्स बंद पडली आहेत.

एफएम रेडिओ ही मुंबईकरांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्यात सकाळी तर कित्येक लोक एफएम ऐकतच प्रवास करतात. सकाळच्या ट्राफिकच्या तणावापासून मुक्त ठेवण्यात एफएमचा फार मोठा वाटा आहे. मात्र अचानक एफएम काम करेनासे झाल्यामुळे श्रोतेही चक्रावले आहेत.