PM Narendra Modi (Photo Credit: ANI)

PM Narendra Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज एकदिवसीय महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. ठाणे- भिंवडी-कल्याण मेट्रो आणि दहिसर- मीरा रोड-भायंदर या मेट्रोचे भूमिपुजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 चे भूमिपूजन केले. या प्रसंगी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे- भिंवडी-कल्याण मेट्रो आणि दहिसर- मीरा रोड भायंदर मेट्रो प्रोजेक्टचं भूमीपुजन

कल्याणप्रमाणेच पुण्यातही मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतूनच केली. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांना वंदन करुन मोदींनी भाषणाला सुरुवात केली.

मेट्रो ही देशातील शहरांची जीवनवाहिनी बनली आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत सरकार मेट्रोचे नेटवर्क देशाच्या विविध शहरांमध्ये वाढवत आहे आणि येत्या काळात अजून काही शहरं मेट्रोमुळे जोडली जातील, असे मोदी म्हणाले.

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण विचारांची तरुण मने आपल्यासोबत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.