PMC बँक खाते धारकांना आता Paytm सुविधेच्या माध्यमातून होणारी ऑटो पेमेंट सेवा बंद
PMC And Paytm (Photo Credits-File Image_

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र बँक (PMC) मधील घोटाळाप्रकरणी आरबीआयने (RBI) या बँकेच्या व्यवहारांवर पुढील सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. तसेच बँकेच्या माजी संचालक जॉय थॉमस, व्रॅम सिंग यांच्यासह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु आरबीआयने बँकेच्या व्यवहारांवर घातलेल्या निर्बंधामुळे खातेधारक चांगलेच अडचणीत आले आहेत. गेल्या आठवड्यात आरबीआयने ट्वीट करत असे सांगितले की, ग्राहकांना आता एकदाच किंवा सहा महिन्यांसाठी 25 हजार रुपये काढता येणार आहेत. यामुळे आता खातेधारकांना दिलासा मिळाला असला तरीही पेटीएमच्या सुविधेचा लाभ घेत असलेल्या ग्राहकांना आरबीआयकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

पेटीएमकडून एक ट्वीट करण्यात आले असून त्यात असे म्हटले आहे की, पीएमसी खाते धारकांना पेटीएमकडून देण्यात आलेली ऑटो पेमेंट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचसोबत SIP च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सुद्धा ठरवून दिलेल्या वेळेत होणार आहे. त्यामुळे पीएमसी खातेधारकांनी अन्य बँक अकाउंट तुम्ही पेटीएमला लिंक करु शकता. पेटीएमच्या माध्यमातून सध्या 200 पेक्षा अधिक बँकांचे व्यवहार केले जातात.(PMC बॅंकेचे माजी चेअरमन Waryam Singh आज मुंबई पोलिसांच्या EOW समोर स्वाधीन होणार)

तसेच गेल्या दोन दिवसांपू्र्वीच ईडीकडून पीएमसी मुंबईत सहा विविध भागांमध्ये छापा टाकला आहे. त्यानुसार FIR दाखल करण्यात आली असून काहींना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पीएमसी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं टाकण्यात आली आहे. सुरूवातीला 1000 प्रतिदिन पैसे काढण्याची मुभा 10,000 रूपयांपर्यंत वाढवून आता 25,000 करण्यात आली आहे.