पिंपरीतील दळवीनगर झोपडपट्टी (Photo Credit : ANI)

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने पिंपरीतील दळवीनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अग्नितांडवात पाच घरं जळून खाक झाली.

दळवीनगर झोपडपट्टीतील एका घरात गुरुवारी (25 ऑक्टोबर) रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही आग आजूबाजूच्या घरातही पसरली. या भीषण आगीत दोघांनी आपला जीव गमावला. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.