मतदानाआधी 48 तासांत सोशल मिडियावर कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करू नये; कोर्टाचे आदेश
सोशल मिडिया (Photo Credits: PTI)

येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections) पार पडतील. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप यांसह अनेक पक्षांकडून जोर लावला जात आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रचार केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष मतदानाआधी 48 तासांत सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहीरात अथवा प्रचाराबाबत संदेश, माहिती प्रसिद्ध होता कामा नये असा महत्वपूर्ण निर्णय कोर्टाने दिला आहे. या आदेश पाळण्यात यावा असा इशारा कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे. अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला तशा सूचना द्याव्यात असा आदेशही कोर्टाने दिला आहे.

याबाबत लोकप्रतिनिधी कायदा 1951 अनुसार 126 कलमांतर्गत ही जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करत मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. मतदानापूर्वी 48 तास हा ब्लॅक आऊट पिरिअड असतो. या काळात राजकारणी कोणत्याही सभा, मोर्चा किंवा कोणत्याही प्रकारचा प्रचार करू शकणार नाहीत. (हेही वाचा : बहीण प्रियंका गांधी यांना बंधू राहुल गांधी देणार गिफ्ट; लोकसभा निवडणुकीत घडणार चमत्कार?)

फेसबुक, ट्टिवटर आणि इन्स्टाग्राम यासारखी सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स सध्याच्या पुढील आपल्या विचारांची दिशा ठरवण्यास फार मोलाची मदत करतात. त्यामुळे प्रचारासंबंधी कोणताही मजकूर सोशल मिडियावाराही प्रसिद्ध होता कामा नये, असे याचिकेत म्हटले आहे.