
Navi Mumbai Municipal Transport कडून नवी मुंबई मधून मंत्रालय/ कफ परेड भागात येणार्या काही एसी बस च्या वेळे मध्ये आता बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागे प्रवाशांची सुरळीत वाहतूक सेवा आहे. दरम्यान या बदलांमुळे सध्या सुरू असलेली कोणतीही सेवा रद्द केली जाणार नाही असे NMMT ने स्पष्ट केले आहे. वेळेमध्द्ये बदल झालेल्या बस सेवांमध्ये यांचा समावेश आहे. या बस नवी मुंबई-मुंबई- नवी मुंबई मध्ये येण्याच्या आणि परतीच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. एप्रिल महिन्यापासून हा बदल लागू असणार आहे.
बस नंबर 106 ही पनवेल रेल्वे स्थानक ते मंत्रालय चालवली जाते. आता ही बस सकाळी 7.20 ऐवजी 7.50 वाजता सुटणार आहे तर संध्याकाळी मंत्रालय वरून 4.50 ऐवजी 6.20 वाजता सुटणार आहे.
बस नंबर 108 ही नेरूळ सेक्टर 46/48 वरून मंत्रालय कडे येणारी बस सकाळी 7.50 ऐवजी 8.15 वाजता सुटणार आहे तर परतीचा प्रवास मंत्रालय ते नेरूळ साठी 5.15 ऐवजी 6.30 वाजता करणार आहे.
बस नंबर 110 ही बस खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय सकाळी 7.30 वाजता सुटेल. पूर्वी ती 7.10 ला जात होती. तर बसचा परतीचा प्रवास संध्याकाळी 5.50 ऐवजी 6.40 वाजता सुरू होणार आहे.
बस नंबर 114 चा प्रवास घणसोली घरोंदा च्या बस सकाळी दोन असणार आहेत. ज्यामध्ये 7.55 आणि 8.10 वाजता बस सुटणार आहे. यापूर्वी ही बस सकाळी 7.40 ला सुटणार होती. दरम्यान मंत्रालय मधून सुटणार्या बसची वेळ 5.05 ऐवजी आता 5.35 आणि 6.05 असणार आहे.
दरम्यान, NMMT ने स्पष्ट केले आहे की मार्ग क्रमांक 107 (CBD ते मंत्रालय), मार्ग क्रमांक 115 (खारकोपर रेल्वे स्थानक ते मंत्रालय), मार्ग क्रमांक 116 (तुर्भे/नेरूळ ते मंत्रालय अटल सेतू मार्गे ), आणि मार्ग क्रमांक 117 खारघर/पनवेल ते मंत्रालय अटल सेतू मार्गे या बसच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एनएमएमटीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांचा पॅटर्न आणि अभिप्रायाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. आमच्या दैनंदिन प्रवाशांसाठी कार्यक्षमता आणि सोयी सुधारणे हे उद्दिष्ट आहे.