मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झाले खातेवाटप; जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते
महाराष्ट्र विधानसभा (Photo Credit : Youtube)

आज अखेरीस महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडला. सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये 13 नव्या चेहऱ्यांना स्थान प्राप्त झाले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना हा फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे, त्यामुळे यंदा मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता होती.आता आज रात्री नव्या मंत्र्यांचे खातेपाताप झाले आहे.

असे झाले आहे खातेवाटप -

राधाकृष्ण विखे-पाटील - गृहनिर्माण खाते

जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी व फलोत्पादन खाते

आशीष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण खाते

संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण खाते

सुरेश खाडे - सामाजिक न्याय खाते

अनिल बोंडे - कृषी खाते

अशोक उईके - आदिवासी विकास खाते

तानाजी सावंत - जलसंधारण खाते

राम शिंदे - पणन व वस्त्रोद्योग खाते

संभाजी पाटील निलंगेकर - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण

जयकुमार रावल - अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

सुभाष देशमुख - सहकार, मदत व पुनर्वसन

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर्गत वादाचे कारण सांगून भाजपात प्रवेश केला होता. यापैकी अनेक नेत्यांचे आज थेट मंत्रीपदाचे गिफ्ट देऊन सरकारमध्ये स्वागत करण्यात आले. यामध्ये नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते मंत्रीपदाची शपथ देऊन सर्वांनाच फार मोठा धक्का दिला आहे.