Nandurbar Bus Fire News : गेल्या काही वर्षांपासून वाहने अचानक पेट घेत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यात आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे. असाच प्रकार नंदुरबारमध्येही घडला. नंदुरबारच्या तळोदा रस्त्यावर नाशिक-अक्कलकुवा एसटी बसला अचानक आग (ST bus caught in fire)लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी (passenger ) झाली नाही. मात्र, एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेवेळी बसमध्ये ३० प्रवासी होते. बसने पेट घेतल्याचे कळताच प्रवासी घाबरले. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ धक्काबुक्की झाली. बसमध्ये पुरूषांसह महिलांचाही समावेश होता. (हेही वाचा :Gujarat Bus Fire: गुजरातच्या धरमपूरमध्ये शाळेची बस आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणालाही दुखापत नाही )
अजून राज्यात उन्हाळा नीट सुरूही झाली नाही. गेल्या वर्षी उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. यात वाहनाचे टायर फुटणे, इंजिनी पेट घेणे अशा गोष्टी घडल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी ( शनिवारी, 10 फेब्रुवारी रोजी) गुजरातच्या सिल्वासाहून धरमपूर, वलसाड येथील विल्सन हिल्स येथे 30 शाळकरी मुले आणि 3 शिक्षकांना घेऊन जाणारी स्कूल बसने पेट घेतला होता. सुदैवाने, आग लागण्यापूर्वी सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसमधून खाली उतरले, त्यामुळे कोणतीही दुखापत झाली नाही. या घटेती आगीचे कारण समजू शकले नव्हते.