Mumbai Water Crisis | representative pic- (photo credit -pixabay)

बीएमसी (BMC) कडून मुंबईच्या एम पूर्व (M East) आणि एम पश्चिम (M West)  भागामध्ये 24,25 ऑगस्ट दिवशी पाणी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी 10 पासून पाणी बंद राहणार असल्याचं पालिकेने कळवलं आहे. दरम्यान एम पश्चिम मध्ये चेंबूर आणि एम पूर्व मध्ये मानखुर्द, देवनार आणि शिवाजी नगर भागाचा समावेश आहे. मुंबईच्या या भागामध्ये दुरूस्तीच्या काही कामांसाठी पाणी कपात केली जाणार आहे. पालिका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, Trombay High-Level Reservoir मध्ये हे काम केले जाणार आहे.

याव्यतिरिक्त, बीएमसीने गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान 1,800 मिमी इनलेटचा वापर करून पुन्हा पाणी भरण्याची योजना आखली आहे. ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशय चेंबूरच्या अणुशक्ती नगर येथे आहे.

बीएमसीने संपूर्ण पाणीकपात लागू होणाऱ्या भागांची यादी जाहीर केली आहे. अधिकार्‍यांनी प्रभावित वॉर्डातील रहिवाशांना पुरवठा निलंबन लागू होण्यापूर्वी पुरेसा पाणीसाठा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. नागरी संस्थेने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये पुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत पाणी भरून ठेवत रहिवाशांच्या सहकार्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारी पाण्याची पाईपलाईन तुटल्याने बीएमसीच्या एच वेस्ट वॉर्डमध्ये खार दांडासारख्या भागाचा पाणीपुरवठा प्रभावित झाला. मोहम्मद रफी चौकात पाईप खराब झाला आहे. वांद्रे पश्चिमेला मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने त्याचा परिणाम झाला आहे. खार दांडा, गझदरबंध, दांड पाडा आणि खारच्या काही भागांना पाणीपुरवठा विलंब झाला असल्याचं बीएमसीच्या एच वेस्ट वॉर्डने ट्विटरवर म्हटले आहे.

मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा आता 83.72 टक्के झाला आहे, असे बीएमसीने एका निवेदनात म्हटले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणार्‍या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 12,11,686 दशलक्ष लिटर किंवा 83.72 टक्के इतका आहे. मुंबई तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथून पाणी घेते.