मुंबई: संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या कारच्या धडकेत हरणाचा मृत्यू; चालकाला अटक
Deer | Image used for representational purpose | Photo Credits : commons.wikimedia

शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Shiv Sena MP Rajendra Gavit) यांच्या मालकीच्या गाडीने बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये (Sanjay Gandhi National Park) एका हरणाला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संजय गांधी नॅशनल पार्कचे डिरेक्टर अन्वर अहमद (Anwar Ahmed) यांनी याबाबत अधिक माहिती देताना ही घटना 28 नोव्हेंबरची असल्याचं म्हटलं आहे. तसेच गाडी ताब्यात घेऊन वाहन चालकाला अटक झाल्याचे वृत्त ANI ने दिले आहे. या प्रकरणी संबंधित नियम आणि अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

मिड -डे मधील वृत्तानुसार, संजय गांधी नॅशनल पार्क मधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. एसयुव्ही कार संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्य दरवाज्याकडे जात होती. त्यावेळेस गांधी टेकडीजवळ हरणाला गाडीची धडक बसली. मुख्य द्वारावर चालकाने याप्रकरणी माहिती दिली. यानंतर हरणाला नॅशनल पार्कच्या पशू इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे हरणाला मृत घोषित करण्यात आले आहे.

ANI Tweet  

2017 साली मार्चमध्ये रिवर मार्च ग्रुपमधील एका सदस्याद्वारा आरटीई द्वारा समोर आलेल्या माहितीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एकूण 8 जानवर मारले गेले आहेत.

अनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल पार्कमध्ये ड्रायव्हिंग कायदे अधिक कडक करून वाहकांना ते पाळण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच लवकरच एक अभियानदेखील सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल पार्कमध्ये प्रतितास 20 किमी पेक्षा कमी वाहन मर्यादेचं आवाहन करणारे अनेक बोर्ड्स लावण्यात आले आहेत.