मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) धैर्य, कर्तृत्व, कामगिरी सर्वश्रुत आहे. अनेक घटनांमधून ते सिद्ध झाले आहे. आज मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणाचा दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. एका वाहतुक पोलिसाला रिक्षात एक पैशाने आणि 13 तोळे सोन्याने भरलेली बॅग मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बॅगची मालकीण असलेल्या महिलेचा शोध घेतला आणि बॅग तिच्याकडे सुपूर्त केली. या बॅगमध्ये तब्बल 10 लाखांचे सोने होते. या घटनेनंतर या पोलिस कर्मचाऱ्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबद्दल बोलताना वाहतूक पोलिसाने सांगितले की, "रिक्षामध्ये एक महिला बॅग विसरली होती. त्यात 13 तोळे सोने आणि पैसे होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून ऑटोरिक्षाचा नंबर शोधण्यात आला. बॅगच्या मालकाचा नंबर शोधून संपर्क केला आणि बॅग त्यांच्या स्वाधीन केली."
ANI Tweet:
महाराष्ट्र: मुंबई पुलिस को ऑटो रिक्शा से 10 लाख रुपये के सोने और कैश से भरा बैग मिला।
ट्रैफिक पुलिस ने बताया, "एक महिला का बैग ऑटोरिक्शा में छूट गया था। हमने सीसीटीवी फुटेज देखकर ऑटोरिक्शा का नंबर निकाला। मालिक का नंबर पता करके कॉल किया गया। बैग में 13 तोला सोना, और पैसे थे।" pic.twitter.com/a0yLMlXBNC
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2021
वाहतुक पोलिस अधिकारी प्रदीप मोरे यांनी सांगितले की, "बॅगच्या मालकीनीने पोलिस स्टेशनमध्ये जावून बॅग तपासली तेव्हा सर्व वस्तू, पैसे तसेच होते. त्यानंतर महिलेने पोलिसांचे आभार मानलेय तसंच वरिष्ठांकडून पोलिस कर्मचाऱ्याला शाबासकीची थाप मिळाली असून अशा प्रकारचे काम करण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या."