Covid Test| Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई शहरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने आता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना कोरोना लक्षणं आढळल्यास स्वतःहून समोर येऊन टेस्ट करण्याचं आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान विभागनिहाय आता हॉस्पिटल्सची वर्गवारीदेखील करण्यात आली आहे. मात्र हॉस्पिटलप्रमाणेच आता मुंबईमध्ये 'COVID-19 Drive-Thru Collection Point'देखील सुरू करण्यात आले आहे. गोरेगाव परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर Suburban Diagnostics कडून ही खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांची चाचणी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसूनच केली जाणार आहे. ठाणे: Coronavirus Lockdown दरम्यान मॉनिंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पोलिसांकडून 'आरती'! (Watch Video)

ANI या वृत्त संस्थेशी बोलताना Suburban Diagnostics च्या टेक्निशनने दिलेल्या माहितीनुसार, गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसूनच कोरोनाची चाचणी करण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येऊ शकते. नागरिक थेट त्यांची कार घेऊन येऊ शकतात. ते ड्रायव्हिंग सीटवर बसलेले असतानाच आम्ही त्यांच्या स्वॅबचे सॅम्पल घेतो. चाचणी झाल्यानंतर 48 तासामध्येच त्याचा रिपोर्ट ऑनलाईन पाठवला जातो. दरम्यान या टेस्टसाठी सुमारे 4500 रूपये दर आकारला जात आहे.

ANI Tweeet

कोरोनाची चाचणी जितक्या लवकर करता येतील तितका या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच रूग्णांमधील आजाराची गुंतागुंतदेखील कमी होणार आहे. सोबतच प्रामुख्याने कोरोनाचे भारतामधील रूग्ण हे Asymptomatic आहेत. त्यामुळे कळत नकळत ते कोरोना व्हायरसचे वाहक बनून समाजात कोरोनाचा प्रसार वाढवत आहेत.