Representative Image (Photo Credits- Pixabay)

मुंबई मध्ये पत्नीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन गायब झाल्याच्या काही आठवड्यांनंतर एका 51 वर्षीय आरोपी पुरूषाला दिंडोशी पोलिसांनी  अटक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पी नायक या आरोपीने नोव्हेंबर 2024 मध्ये पत्नीला विवाह पोर्टलवर भेटून लग्न केले होते. त्याच्या अटकेनंतर त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचे शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले ज्यामुळे तो गुन्हा करण्यास प्रवृत्त झाला. यामधूनच त्याने घरात दागिन्यांची चोरी केली आहे.

तक्रारदार महिला 50 वर्षांची असून तिला आधी च्या लग्नात एक मुलगी आहे. पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे पुन्हा लग्न लावून दिले. तिला एका मॅट्रिमोनियल साइटवर नायकचे प्रोफाइल आवडले आणि तिने त्याच्याशी चॅट करायला सुरुवात केली. त्याने तिला सांगितले की पत्नी आणि मूल कोविड -19 साथीच्या आजारात गमावले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये दोघांनी तक्रारदाराच्या कुटुंबियांसोबत कोर्ट मॅरेज केले होते.

दुसर्‍या लग्नानंतर जोडपे मालाड पूर्व येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, नायक यांनी डिसेंबर 2024 मध्ये तिच्या मुलीच्या लग्नासाठी खूप मेहनत घेतली आणि तिचा विश्वास जिंकला. तक्रारदार यांची मुलगी आणि जावई मुंबई मध्ये विलेपार्ले येथे राहत होते.

जानेवारी महिन्यात तक्रारदाराने तिचे दागिने विलेपार्ले येथील घरातून मालाडच्या घरी नेले. नायक त्यांच्या मालाडच्या घरी तिजोरी बसवण्याचे काम करत होते. तिजोरी तयार नसल्याने तक्रारदाराने 24 जानेवारी रोजी तिचे 17 लाख रुपये किमतीचे दागिने आणि 1.5 लाख रुपयांची रोकड कपाटात ठेवली. तब्येत ठीक नसल्याने ती झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी नायक घरात नव्हता. दागिने आणि रोख रक्कमही गायब झाली होती. तिने त्याला वारंवार फोन केला पण त्याचे दोन्ही फोन नंबर बंद होते.त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांना तो पुण्यातील बाणेर मध्ये असल्याचं कळालं.तेथून त्याला अतक केली. अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. "आम्ही त्याच्याकडून सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. त्याने बहुतेक रोख खर्च केले होते आणि आम्ही 35000 रुपये जप्त करू शकतो," असे पोलिसांनी सांगितले आहे.