देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, आता संक्रमणाची नवीन प्रकरणे बर्याच प्रमाणात कमी झाली आहेत, परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोनाची तिसरी लाट देखील येऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना लक्ष्य करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईतून (Mumbai) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इथल्या 50 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये कोरोना विषाणूविरुद्धच्या अँटीबॉडीज सापडल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या सीरो सर्वेक्षणात (Sero Survey) ही बाब समोर आली आहे.
सीरो सर्व्हेक्षणात आढळले आहे की, आधीच्या तुलनेत आता लहान मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज वाढल्या आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी बीएमसीच्या कस्तुरबा मॉल्यूक्युलर डायग्नोस्टिक लॅबोरेटरी आणि बीएलवाय नायर हॉस्पिटल यांनी हे सीरो सर्वेक्षण केले आहे. माहितीनुसार, हे सीरो सर्वेक्षण 1 एप्रिल 2021 ते 15 जून 2021 दरम्यान करण्यात आले. मुंबईतील 24 वॉर्डांतून एकूण 2,176 रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 50 टक्के पेक्षा जास्त जण आधीच कोरोना विषाणूच्या संपर्कात आले आहेत.
बृहन्मुंबई नगर निगम द्वारा किए गए एक सीरो-सर्वेक्षण से पता चला है कि मुंबई में बच्चों की 50 प्रतिशत आबादी ने अपेक्षित तीसरी लहर से पहले, #Covid19 एंटीबॉडी विकसित कर ली है। इसकी जानकारी एक शीर्ष अधिकारी ने सोमवार को दी। pic.twitter.com/75rjbIWin3
— IANS Hindi (@IANSKhabar) June 28, 2021
जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 10 ते 14 वर्षे वयोगटातील 53.33 टक्के मुलांमध्ये सर्वाधिक सीरो पॉझिटिव्हिटी आढळली आहे. त्याच वेळी 1 ते 4 वयोगटातील 51.04 टक्के, 5 ते 9 वयोगटातील 47.33 टक्के आणि 15 ते 18 वर्षे वयोगटातील 51.39 टक्के मुले सीरो पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की कोरोनाच्या दुसर्या लाटेचा लहान मुलांवर मोठा परिणाम झाला आहे. (हेही वाचा: Delta and Delta Plus Variants FAQs: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस: वारंवार विचारले जाणारे प्रश्न आण त्यांची उत्तरे)
सीरो सर्वेक्षणात एकूण 51.18 टक्के पॉझिटीव्हिटी रेट आढळून आला आहे. मार्च महिन्यामध्ये जेव्हा सीरो सर्व्हे करण्यात आला होता, तेव्हा त्यामध्ये 1 ते 18 वयोगटातील लोकसंख्येमध्ये 39.4 टक्के इतका सीरो पॉझिटिव्हिटी रेट दिसला होता.