मुंबई: HDIL मालकाच्या घरासमोर  PMC बॅंक कर्मचार्‍यांची आंदोलनं
PMC BANK (Photo credits: Twitter)

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील पीएमसी बॅंकेवर आरबीआय कडून आर्थिक निर्बंध घातल्यानंतर खातेदारांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या आर्थिक व्यवहार करण्यावर बॅंकेने निर्बंध घातले आहेत. प्रतिदिवसा ग्राहकाला केवळ 100 रुपये काढण्याची मुभा असल्याने अनेकांसमोर आर्थिक चणचण उभी राहिली आहे. आता या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बॅंकेने प्रयत्न सुरू केले आहेत. आज मुंबईमध्ये पीएमसी बॅंकेच्या कर्मचार्‍यांनी HDIL ग्रुपच्या मालकाच्या घरासमोर आंदोलन करायला सुरूवात झाली आहे. PMC बॅंकेवर RBI चे निर्बंध: जाणून घ्या खातेदार 1000 रूपयांपेक्षा अधिक पैसे का काढू शकणार नाहीत?

HDIL हा ग्रुप लोन डिफॉल्टर कंपनींच्या यादीमध्ये आहे. पीएमसी कडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आलं आहे. सरकारचा वरदहस्त असल्याने काही दिवस ही कंपनी निर्बंधपणे काम करत होती. मात्र कर्जाचे हप्ते फेडू न शकणार्‍या या कंपनीमुळे पीएमसी बॅंकेवरही आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी अनेक सामान्य खातेदार सध्या आर्थिक संकटांमध्ये अडकले आहेत. Bloomberg data,च्या माहितीनुसार HDIL ला पीएमसी बॅंकेकडे 1996.9 कोटी रूपये देणे आहे.

ANI Tweet

सध्या सामान्य खातेदारांसोबत अनेक सोसायटीची खातीदेखील पीएमसी बॅंकेमध्ये असल्याने कोट्यावधींची रक्कम अडकून पडली आहे. आरबीआयने पीएमसी बॅंकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहे. हे आर्थिक निर्बंढ हटवण्यासाठी बॅंकेला व्यवहारांमधील अनियमितता दूर करणे गरजेचे आहे. तरच खातेदारांसमोरील आर्थिक चणचण दूर होणार आहे.