Mumbai Metro-3 | (Photo Credits: facebook)

Mumbai Metro-3 जी अर्थात Aqua Line, म्हणून ओळखली जाते त्याची सेवा आता वरळी पर्यंत वाढवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10 एप्रिलला ही सेवा वरळीपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या ही अंडरग्राऊंड मेट्रो लाईन बीकेसीपर्यंतच (BKC) सुरू आहे. पण आता ती वरळी (Worli) पर्यंत जाऊ शकते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंबईकरांचा प्रवास थोडा सुकर होण्याचा अंदाज आहे.

Metro-3 चा दुसरा टप्पा शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. यामध्ये धारावी आणि सिद्धिविनायक मंदिराचा समावेश आहे. या मेट्रो सेवेमुळे प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडी कमी होण्याचा अंदाज आहे. असे FPJ चे वृत्त आहे.  

 Mumbai Metro-3  Phase 1 मध्ये कोणाचा समावेश? 

अ‍ॅक्वा लाईनच्या पहिल्या भागाचे उद्घाटन 7 ऑक्टोबर 2024 रोजी सार्वजनिक वापरासाठी करण्यात आले. 12.69 किमी लांबीच्या या टप्प्यात बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) टी१, सहार रोड, सीएसएमआयए टी२, मरोळ नाका, अंधेरी, सीप्झ आणि आरे कॉलनी जेव्हीएलआर अशी प्रमुख स्थानके आहेत.

 Mumbai Metro-3  Phase 2

नव्याने पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्यात धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे. News18 च्या वृत्तानुसार, आरे कॉलनी (फेज १ चा शेवटचा टप्पा) ते आचार्य अत्रे चौक (फेज २ चा शेवटचा थांबा) पर्यंतच्या प्रवासाचे भाडे 60 रुपये असेल.

Mumbai Metro-3 मुळे आरे ते धारावी प्रवास 27 मिनिटे, शीतलादेवी मंदिर 29 मिनिटे, दादर मेट्रो 32 मिनिटे,सिद्धिविनायक मंदिर 34 मिनिटे, वरळी 36 मिनिटे आणि आचार्य अत्रे चौक 39 मिनिटांत पोहचता येणार आहे.