मध्य रेल्वेच्या कल्याण नजिक आंबिवली स्टेशन (Ambivli Railway Station) जवळ लेव्हल क्रॉसिंग करताना एका डंबरने रेल्वेच्या गेटला धडक दिल्याने ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान ओव्हरहेड वायरच्या दुरूस्तीचे काम पूर्ण सुरू झाले असून सीएसटीएमच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस मोठी रेल्वेची सेवा ठप्प झाल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर गर्दी पहायला मिळाली आहे. Mumbai: नेरुळ-सिबीडी रेल्वे स्थानकादरम्यान 2 ट्रेन आमने-सामने; मोठा अनर्थ थोडक्यात टळला, लोकलसेवा विस्कळीत.
आज (3 जानेवारी) सकाळी 5 च्या सुमारास हा प्रकार घडल्याने सुमारे पाऊण तास रेल्वेची सेवा खंडीत झाली होती. मात्र आता हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होत आहे. आंबिवली स्थानकातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने आता मुंबई लोकल सोबतच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दणका, गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महाग Watch Video
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, पंजाब मेल अशा गाड्या खोळंबल्या होत्या. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रेल्वेने अर्धा तासाचा ब्लॉक घेतला होता त्यामध्ये ओव्हरहेडचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. दरम्यान काल (2 जानेवारी) संध्याकाळी देखील हार्बर मार्गावरी नेरूळ- सीबीडी बेलापूर दरम्यान अपघाताचा प्रसंग उभा ठाकला होता.