Water | representative pic- (photo credit -pixabay)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांमध्ये देखील अद्याप मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट होत चालली आहे. याच कारणास्तव मुंबईतील पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. दरम्यान मुंबई महापालिकेसह ठाणे भिवंडी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये 22 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने मुंबईसह इतर महापालिकेंना 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाण्याची पातळी खालावली आहे. ( Mumbai Most Expensive City for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत नागरिकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; आशियामध्ये 21 व्या क्रमांकावर, दिल्ली कोणत्या स्थानावर घ्या जाणून)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसामध्ये शून्य टक्के, अप्पर वैतरनात शून्य टक्के, तानसा तलावात 22 टक्के, तुलसी 24 टक्के, मोडकसागरमध्ये 15 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पाणीपातळी कमी होत आहे. मुंबईतील सात तलावांमध्ये एकूण 5.42 टक्के पाणी शिल्लक आहे. तसेच या तलावाची पाणी क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून, विविध जलवाहिन्यांद्वारे दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईतील सात तलावांमधील उपलब्ध पाणीपुरवठा आणि अतिरिक्त पाणीपुरवठा यांचा आढावा या आठवड्याच्या अखेरीस घेतला जाईल.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयात आज एकूण 77,851 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये 10 ते 15 टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे.