Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये वसई (Vasai) येथील अंबाडी रोड (Ambadi road)  येथील ट्रान्फफॉर्ममरमध्ये आग लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आगीमध्ये 3 कार आणि 2 दुचाकी पेटल्या आहेत. तसेच काही दुकानंदेखील या आगीमध्ये सापडली आहेत. वित्तहानी झाली असली तरीही सुदैवाने मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही.  अशी माहिती टाईम्स ऑफ़ इंडियाकडून देण्यात आली आहे.

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.