Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

43 वर्षीय उद्योजकाचा हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplantation) शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 50 तासात मृत्यू झाला आहे. मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात ही घटना घडली. हेअर ट्रान्सप्लांट करताना झालेल्या औषधांच्या रिअॅक्शनमुळे उद्योजकाचा मृत्यू झाला आहे, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येणार आहे.

श्रवणकुमार चौधरी (Shrawan Kumar Chaudhary) (वय 43) असे या उद्योजकाचे नाव दोन दिवसांपूर्वी चिंचपोकळी येथील खाजगी रुग्णालयात हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली होती. ही शस्त्रक्रिया सुमारे 15 तास सुरु होती.

मात्र हेअर ट्रान्सप्लांटसाठी दिलेल्या औषधांमुळे श्रवणकुमार चौधरींना अॅलर्जिक रिअॅक्शन झाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर, घशावर सुज यायला लागली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही आणि आपला त्यांना जीव गमवावा लागला.