Representational Image (Photo Credits: Pixabay)

5th and 8th Scholarship Result 2020:   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल अखेर लागला आहे. यंदा 16 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या स्कॉलरशीप परीक्षेचा (Scholarship Exam) अंतरिम निकाल मंडळाने काल (9 ऑक्टोबर) उशिरा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल puppss.mscescholarshipexam.in 2020 किंवा mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. शाळांना देखील त्यांचे निकाल लॉग ईनच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. यंदाच्या वर्षी कोविड 19 मुळे शैक्षणिक वर्षाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लावण्यास उशिर झाला आहे. इथे पहा अंतरिम निकालाचं नोटिफिकेशन.

कसा पहाल तुमचा शिष्यवृत्ती परीक्षा 2020 चा निकाल?

  • puppss.mscescholarshipexam.in 2020 किंवा mscepune.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्स ओपन करा.
  • त्यानंतर होम पेज वर तुम्हांला शिष्यवृत्ती परीक्षा 2020 निकाल साठी लिंक दिसेल.
  • निकालाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल त्यावर तुमची माहिती भरा आणि सबमीट क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रिनवर तुम्हांला निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी शाळांच्या लॉग ईन मध्ये 20 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरसाठि 50 रूपये आकारले जातील तर ही रक्कम ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून भारता येईल. तसेच नाव, अभ्यास्क्रम यामध्ये दुरूस्ती असेल तर ते अर्ज देखील शाळेच्या लॉग ईन द्वारा 20 ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येऊ शातात.

अर्ज दाखल झाल्यानंतर सुमारे 30 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हांला निर्णय कळवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल आणि शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.