Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Molestation Case In Mumbai: मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) उपचार घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग (Molestation) करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमवारी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला (Sanitation Worker) अटक केली. रोहिदास सोळंकी असे आरोपीचे नाव आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

मुलीने डॉक्टरांना घटनेची माहिती दिल्यानंतर पीडितेच्या आईने जेजे मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पीडितेची आई जेव्हा तिचे अंथरुण साफ करत होती, तेव्हा आरोपी स्वच्छता कर्मचारी मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याकडे आला. पीडित मुलीची आई डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा - Mumbai: बस दुरुस्त करताना 32 वर्षीय मेकॅनिकचा मृत्यू; बस मालकाविरोधात गुन्हा दाखल)

मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. राज्यात दररोज महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान ऑफ ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईत दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक करण्यात आली होती. गुन्हेगारांच्या अटकेच्या मागणीसाठी संघटनांनी पोलीस ठाणे आणि रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने केली.

याप्रकरणी निषेध सुरू झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आणि विनयभंगाच्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांसह तीन जणांना अटक केली. एक महिला पोलीस हवालदार आपल्या महिला मैत्रिणीसोबत विक्रोळी पश्चिम भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होती. महिला रस्त्याने जात असताना सूर्या नगरमधील एलबीएस रोडवर स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. आरोपीने महिलेला मिठी मारली आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिला कॉन्स्टेबलने त्याला पकडण्यात यश मिळविले. तथापि, दुसर्‍या स्कूटरवरील एका व्यक्तीने त्याला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केली.