Maharashtra Weather Forecast: राज्यात मान्सूनने जोर पकडला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहेत. भारतीय हवामान खात्याने(Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी 14 जुलै रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Heavy Rain) शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुंबईत धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर आज रविवारी पावसाचा जोर आणखीच वाढणार, अशा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पश्चिम घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे.