Mega Block: आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक
Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai MegaBlock: दर रविवार प्रमाणे आजही (17 मार्च) रेल्वेमार्गाच्या विविध कामांसाठी तसंच कुर्ला-शीव पुलाच्या कामामुळे दरम्यान मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसंच आसनगाव-कसारा मार्गावर पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर देखील बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर देखील कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांनी खोळंबा टाळण्यासाठी बदललेल्या वेळा लक्षात घेऊन बाहेर पडणे अधिक सोयीस्कर ठरेल.

मध्य रेल्वे:

मध्यरात्री 1 ते पहाटे 4 (शनिवार-रविवार आणि रविवार-सोमवार) या दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील धीम्या आणि जलद लोकलसेवेवर परिणाम होणार आहे.

शनिवारी-रविवारी रात्री उशिरा धावणाऱ्या 12:28 सीएसएमटी-ठाणे, 12:31 कुर्ला लोकल रद्द करण्यात आली आहे.  10:01 अंबरनाथ-सीएसएमटी ही लोकल ठाणे स्थानकात रद्द करण्यात येतील.

माटुंगा-मुलुंड दरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 रविवार दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असून या काळात धीम्या मार्गावरील फेऱ्या डाऊन फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. जलद-अर्धजलद अप लोकल सुमारे 15 मिनिटे तर जलद-अर्धजलद डाऊन लोकल सुमारे 20 मिनिटे आणि धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

कर्जत स्थानकात सकाळी 10:40 ते दुपारी 1:40 (रविवार) दरम्यान ब्लॉक असून 10:48 आणि 12:05 ठाणे-कर्जत, 1:57 ची कर्जत-सीएसएमटी या लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत.

आसनगाव-कसारा या मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी 10:50 ते दुपारी 12:50 (रविवार) रद्द होणार आहेत. तर 9:41 आणि 10:16 ची सीएसएमटी-कसारा लोकल आसनगाव स्थानकात रद्द करण्यात येईल. 11:12, 11:19 या दोन कसारा-सीएसएमटी लोकल सुमारे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेवर कुर्ला वाशी दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 3:40 (रविवार) अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी-वाशी-बेलापूर-पनवेल-सीएसएमटी मार्गावर अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 (रविवार) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.