मुंबई: अंधेरी येथील वाकोला फ्लॉयओव्हरजवळ झालेल्या अपघातामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम
Image used for representational purpose only (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील (Western Express Highway) वाकोला फ्लॉयओव्हर (Vakola Flyover) वर झालेल्या अपघातामुळे जबरदस्त ट्राफीक जॅम आला आहे. सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या जबरदस्त ट्राफीक जॅम झाल्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोर जावे लागत आहे. वृत्तानुसार, वाकोला फ्लॉयओव्हरवरुन साऊथ डिरेक्शन (दक्षिण दिशेला) जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी 7:30 नंतर ट्रॅफीक जॅम होण्यास सुरुवात झाली.

प्रवाशांचे ट्विट्स:

काही युजर्सने ट्विटरच्या माध्यमातून या अपघाताची माहिती दिली आहे. तसंच मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे लोकांनी म्हटले आहे.