प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात मराठवाडा (Marathwada) हा भाग दरवर्षी दुष्काळच्या छायेत असतो. यंदाही मराठवड्यातील अनेक भागामध्ये दुष्काळ आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी मराठवाड्यात ऊस लागवडीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी फडणवीस यांच्याकडे ऊस लागवडीवर बंदी (Sugarcane Ban) घालण्याची शिफारशीचा अहवाल सादर करण्य्यात आला आहे. सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar)  यांनी साखर कारखानदारीचा अभ्यास करून अहवाल तयार केला असून साखर कारखानदारी बंद करून ऊस लागवडीवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.  महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी; दुष्काळाचे सावट हटण्याची चिन्हे

 मराठवाडा मध्ये 3 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली जाते. यावर प्रति हेक्टर 2 लाख लीटर पाणी आवश्यक असते. हा आकडा 217 टीमसी आहे. यामध्ये जायकवाडी सारखी 2 धरणं भरतील. त्यामुळे ऊस लागवड आणि त्यासाठी आवश्यक पाणी लक्षात घेता दुष्काळाचं मूळ कारण हे ऊस लागवड असल्याचं निर्दशनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात दुष्काळाशी सामना करायचाअसेल तर ऊस लागवड बंद करावी अशी शिफारस आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहचली आहे.

ऊस लागवड बंद करून त्यांच्याऐवजी डाळ किंवा तेलबीयांचे पीक घेतल्यास सुमारे 22 लाख शेतकर्‍यांना त्याचा फायदा होऊ शकतो असेही अहवालात म्हटलं आहे. तसेच ऊस लागवड बंद केल्यास त्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचा वापर मोठे क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं. परिणामी दुष्काळ 60% नी कमी होऊ शकतो असा दावाही करण्यात आला आहे. ऊसाची लागवड कमी केल्यास पाण्याची समस्यादेखील कमी होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.