
Marathi Menu Cards in Mumbai: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील हॉटेल्समध्ये मराठीतून मेन्यू कार्डची मागणी जोर धरू लागली आहे. यांच्या पक्षाच्या एका नेत्याने हि मागणी केली आहे.तसे निर्देश दिले नाहीत तर तो मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेच्या एका नेत्याने मुंबई जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हॉटेलचे मेन्यू कार्ड मराठीत असावे, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे उपविभागप्रमुख कृष्णा पवळे यांनी हे पत्र लिहिले आहे. इतर राज्यातील रेस्टॉरंट्स आणि भोजनालये त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देतात, परंतु महाराष्ट्रात तसे नाही, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. हॉटेल मालक, रेस्टॉरंट आणि भोजनालयांना त्यांचे मेनू कार्ड मराठीत ठेवण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्या कोणालाही मराठी शिकण्याची गरज नाही, असे म्हणत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित करत मराठीतून मेन्यू कार्ड ची मागणी केली आहे.