राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती उमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली. (हेही वाचा - Raigad Shocker: रिव्हर राफ्टिंग करताना पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू; रायगडमध्ये घडली दुदैवी घटना)
पाहा पोस्ट -
ऊर्जा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष भेट!@MSEDCL#Maharashtra #Mumbai #EnergyDepartment pic.twitter.com/37v7FNt3J3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2024
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्या मध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता 1000 रुपया इतका करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहा पोस्ट -
🕧 12.30pm | 7-7-2024 📍 Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.३० वा. | ७-७-२०२४ 📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
💡 Chaired a meeting with the senior officials of the Energy Department to discuss important matters.
💡 ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर… pic.twitter.com/m0KxUpdrCa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2024
ऊर्जा विभागाच्या या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.