गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून पुन्हा आदिवासी लोकांची हत्या; पंधरा दिवसात सात खून
Maoists (Photo Credits: PTI/File)

नागपूर येथील गडचिरोली (Gadchiroli) भागामध्ये पुन्हा नक्षलवाद्यांची(Maoists)दहशत डोकं वर काढायला सुरुवात झाली आहे. आज, शनिवार (2 फेब्रुवारी) दिवशी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी दोन व्यक्तींना पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ठार केले आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये सात व्यक्तींचा नक्षलवाद्यांनी अशाप्रकारे खातमा केला आहे. असे रिपोर्ट्समधून उघड झाले आहे.

धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथे दोन आदिवासी व्यक्तींचा मृतदेह आढळून आला आहे. गिरमा कुडयामी आणि सिमरु अशी या मृतांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी ट्रक आणि जेसीबी यांना आग लावून रस्त्यावर सोडले होते. तसेच झाड कापून रस्ता ब्लॉक करण्यात आला होता. नक्षलवाद्यांच्या कारवाईचा बिमोड करण्यासाठी सध्या पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा दल गडचिरोलीसह आसपासच्या भागामध्ये दाखल करण्यात आले आहेत. 25-31 जानेवारी दरम्यान नक्षलवाद्यांनी या भागात शहीद सप्ताह पाळला होता.