COVID19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात आज 10 हजार 320 रुग्णांची नोंद, 265 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

COVID19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात आज 10 हजार 320 रुग्णांची नोंद, 265 जणांचा मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात आज आणखी 10 हजार 320 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 22 हजार 118 वर पोहचली आहे. यापैंकी 14 हजार 994 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai Today Case: मुंबईत आज 1 हजार 100 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 53 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातील दरामध्ये आणखी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2020 09:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).