Anil Deshmukh | Photo Credits: Twitter

चीन सह परदेशातून येणार्‍या नागरिकांच्या माध्यमातून भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मुंबईसह देशातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पर्यटकांची आणि भारतात येणार्‍या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. दरम्यान ज्या नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं नाहीत त्यांना Home Quarantine चा सल्ला दिला जातो. त्यानंतर टेलिफोनिक माध्यमातून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाते. मात्र आता काही नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्गाची भीषणता लक्षात येत नसल्याने ते समाजात बिनधास्त फिरताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या आजाराची भीती अधिक वाढत आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी Home Quarantine चा सल्ला दिलेले कोरोना संशयित रूग्ण समजात फिरताना दिल्यास त्यांच्याविरूद्ध गुन्हे नोंदवण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. Epidemic Diseases Act चे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान तसे आदेश महाराष्ट्र पोलिस कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे.

मुंबई मध्ये मागील दोन दिवसांपासून Home Quarantine चा शिक्का हातावर असलेले काही जण सामान्यपणे ट्रेनमध्ये फिरताना दिसले. त्या सक्तीच्या आरामाचा सल्ला देऊनही ते मोकाट फिरत असल्याचे पाहून सहप्रवाशांनी त्यांनी हटकले. या प्रकार वाढू नये म्हणून सध्या प्रशासनाकडून कडक पाऊलं उचलली जात आहेत. Coronavirus: कार्यालयात 50 % पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या भायंदर येथील कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांची कारवाई.

अनिल देशमुख यांचे ट्वीट

सध्या देशभरात कोरोना व्हायरसचं लोण पसरलं असून 4 जणांचा बळी गेला आहे. तर सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण भारतातील महाराष्ट्र राज्यात आहेत. दरम्यान भारतामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत याबाबत माहिती देण्यासाठी रात्री 8 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना संबोधित करणार आहेत.