Celebrity Tweet Controversy: सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोठे विधान
दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केले आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसे होऊ देऊ नका, असे आवाहन केले होते.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केले आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसे होऊ देऊ नका, असे आवाहन केले होते. मात्र, या सर्वांच्या ट्विटमध्ये साम्यता असल्याने कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे या सेलिब्रिटींच्या ट्विटविषयी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी मोठे विधान केले आहे.
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लता मंगेशकर आमचे दैवत असून सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उदभवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत. हे देखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोखठोक भुमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचा फोन
अनिल देशमुख यांचे ट्विट-
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लता मंगेशकर आमचे दैवत (१/२) pic.twitter.com/WBdtzUH2x1
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 15, 2021
दरम्यान, सचिन सावंत म्हणाले होते की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी शेतकर्यांच्या मृत्यूवर काहीच बोलले नाहीत. बऱ्याच दिवसांपासून ते शांत राहिले. परंतु, अचानक त्या सर्वांनी ट्विट सुरू केले. हे ट्विट पाहून असे दिसते की, भाजप सरकारच्या दबावाखाली हे ट्विट केले गेले असावेत, असेही ते म्हणाले होते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2021 06:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

