महाराष्ट्रात कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाचे बारा वाजले आहेत. मागील दीड वर्ष शाळा ऑनलाईन परीक्षा घेत होत्या. मग 10वी,12वी च्या बोर्ड परीक्षा (Board Exams) देखील ऑनलाईन घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. पण आज राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यंदा कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. देखील वाचा: Maharashtra Board SSC, HSC Exam Timetable: दहावी, बारावी 2022 परीक्षांचं विषयांनुसार वेळापत्रक जारी; mahahsscboard.in वरून करा डाऊनलोड.
वेळापत्रकानुसार म्हणजे 12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी पासून होणार आहे. तर 10वीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना शाळेतच परीक्षा केंद्र दिली जाणार आहेत. विद्यार्थी संख्येनुसार उपकेंद्र दिली जाणार आहेत. एकूण अभ्यासक्रमाच्य 75% अभ्यासावरच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. राज्यात सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा व्हावी म्हणून 5 पट परीक्षा केंद्र उपलब्ध केली जाणार आहे. एका वर्गात कमाल 25 विद्यार्थी असतील आणि ते वर्गात झिक झॅक पद्धतीने बसणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षेसाठी करोना लस बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही, ते देखील परीक्षा देऊ शकणार आहेत.
दरम्यान विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने किमान 15 मिनिटं ते कमाल 30 मिनिटं अधिक वेळ असणार आहे. सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना 10.20 वाजता पेपर दिला जाईल तर दुपारच्या सत्रामध्ये 2 वाजून 50 मिनिटांनी प्रश्नपत्रिका मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यंदा लवकर परीक्षा केंद्रांवर पोहचावं लागणार आहे. Maharashtra Board Exams 2022: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ .
ऑनलाईन परीक्षा का नाही?
महाराष्टृ राज्य शिक्ष मंडळाच्या परीक्षांचाचे स्वरूप पाहता ते संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न असे असते. त्यात 10वी,12वी दोन्ही परीक्षांचा विचार करता 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत असे बोर्डाने सांगत ऑनलाईन परीक्षेचा पर्याय फेटाळला आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी कोणतीही पत्र मिळाली नसल्याचही सांगितलं आहे.
वर्षा गायकवाड ट्वीट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वी आणि इयत्ता १० वीच्या परीक्षा आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी काही विशिष्ट उपाय योजना जाहीर केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे @msbshse @MahaDGIPR pic.twitter.com/B8L4fDMV4z
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 3, 2022
वैद्यकीय कारणामुळे, कोरोनामुळे परीक्षा न देऊ शकणार्यांसाठी पुरवणी परीक्षेचा पर्याय नंतर दिला जाणार आहे. ही परीक्षा 31 मार्च ते 18 एप्रिल असेल. तसेच परीक्षा काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी अधिक भरारी पथकं तैनात केली जाणार असल्याचंही शिक्षण मंडळाने आज स्पष्ट केले आहे.