भारतामध्ये काल (13 जुलै) सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात एचएससी परीक्षांच्या निकालाचे (HSC Result Date) वेध लागले आहेत. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यात 15-20 जुलै दरम्यान 12वीचे निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितल्यानंतर आता 12वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in सह अन्य संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान शिक्षण मंडळाकडून अजूनही 12वी निकाल तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र येत्या 1-2 दिवसांतच त्याची घोषणा होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतामध्ये काल जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या निकालामध्ये पुणे विभागाचा निकाल 90.39% इतका आहे. दरम्यान महाष्ट्राच्या पुणे विभागात महाराष्ट्रासह गोवा, दीव-दमण, नगर हवेली यांचा समावेशदेखील केला जातो. काल सीबीएससीच्या जाहीर झालेल्या एकूण निकालामध्ये उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 88.78 टक्के आहे. हे प्रमाण याआधीच्या वर्षीपेक्षा 5.38 टक्क्यांनी जास्त आहे.
मागील वर्षी महाराष्ट्रात HSC चा निकाल 28 मे दिवशी लागला होता. 2019 मध्ये बारावीचा राज्यातील एकूण निकाल 85.88% लागला होता. यामध्ये मुलींचा निकाल 90.25% आणि मुलांचा निकाल 82.40% लागला होता. यामध्ये 22 विषयांचा निकाल 100% होता. विज्ञान शाखेचा 92.07%, कॉमर्सचा 88.28 % तर आर्ट्सचा 76.45 % निकाल लागला होता. त्यामुळे आता यंदाच्या 12वीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
HSC 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
12 वीचा निकाल हा करियर निवडीचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने महाराष्ट्रात उत्तम कॉलेजमध्ये अॅडमिशन सोबतच परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणार्यांना 12वीचा निकाल आणि त्याचे गुण महत्त्वाचे असतात. महाराष्ट्रात 12वीचे सीबीएसई आणि आयसीएसई अशा दोन्ही बोर्डाचे निकाल आता जाहीर झाले आहेत आता केवळ राज्याच्या शिक्षण मंडळ निकालाची प्रतिक्षा आहे. ती देखील येत्या काही दिवसांत पूर्ण होईल.