Monsoon Session of Maharashtra Assembly: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै
सोमवार (३० जून) पासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हे अधिवेशन होणार आहे.
महाराष्ट्र सरकार चे पावसाळी अधिवेशन यंदा 30 जून ते 18 जुलै दरम्यान होणार आहे. प्रथेनुसार, 29 जुलैला चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये हिंदी सक्ती वरून सरकारला घेरले जाऊ शकते. सोबतच शेतकर्यांच्या कर्जमाफीवरूनही विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. पण नंतर हिंदी सक्ती हटवत तिला तिसरी भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य केले आणि आता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अधिवेशनामध्येही यावरून सरकारला जाब विचारला जाऊ शकतो.
हिंदी सक्ती प्रमाणेच राज्यात सध्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेवरून वातावरण तापलेलं आहे. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे पण या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने कोल्हापूर, धाराशिव, बीड आणि अन्य भागात शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यात आला आहे त्यामुळे आता सरकार यावरही आक्रमक विरोधकांचा कसा सामना करणार हे पहावं लागणार आहे. Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी; पहिल्या वर्षी 10 टक्के आणि 5 वर्षांत 26 टक्के वीजदर होणार कमी .
आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबद्दल कार्यक्रमाची निश्चिती झाली आहे. त्यानंतर तारखा जाहीर झाल्या आहेत. हे विधिमंडळ अधिवेशन 3 आठवडे चालणार आहे. या निवडणुकांमध्ये सर्व 29 महानगरपालिका, 257 नगरपरिषदा, 26 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समित्या निवडणुका होणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2025 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

