Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी; पहिल्या वर्षी 10 टक्के आणि 5 वर्षांत 26 टक्के वीजदर होणार कमी

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला.

Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी; पहिल्या वर्षी 10 टक्के आणि 5 वर्षांत 26 टक्के वीजदर होणार कमी
Representational Image (Photo credits: PTI)

महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत, 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.

राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. शेतकऱ्यांना बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. (हेही वाचा: Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: आता अवघ्या 8 तासांत नागपूर-गोवा प्रवास; शक्तीपीठ एक्सप्रेसवेसाठी राज्याकडून 20,787 कोटींची मंजुरी, धार्मिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प)

Maharashtra Electricity Rates:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).