लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागताच आता लोकांचे लक्ष लागलेय ते विधानसभा निवडणुकांकडे. त्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून जनतेची नवनवीन योजनांची घोषणा करण्याचा आज दिवस आहे असे म्हणायला हरकत नाही. आज दुपारी दोन वाजता राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2019) सादर होणार आहे. 2014 मध्ये सत्तेवर आलेल्याभाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्याकारणाने आजच्या अर्थसंकल्पात काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित अशा घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता. त्यामुळे आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याविना पार पडला. मात्र अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हवे असेल तर विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करावी, अशी अट मुख्यमंत्र्यांनी घातली असल्याचे समजते. ही अट ठेवून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांची कोंडी केली आहे. याबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे.
महा अर्थसंकल्प २०१९
मंगलवार १८ जून २०१९ रोजी दुपारी १.४५ पासून#MahaBudget2019
Tuesday, June 18, 2019, 1.45pm onwards pic.twitter.com/K64mF1SUJk
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) June 17, 2019
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. त्याबाबतही आज काही तरी महत्त्वपुर्ण भूमिका घेतली जाईल त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिवेशनानंतर काही काळातच विधासभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांनी आपली प्रतिमा मलीन होऊन नये. तसेच, अडचणीत आणणारे विषय फारसे चर्चेत येऊ नयेत असा सरकारचा प्रयत्न राहिल. तर, काहीही करुन सरकारला अडचणीत आणायचेच असा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे.