Loksabha Elections 2019: जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिने बजावला मतदानाचा अधिकार
Jyoti Amge cast her vote in Nagpur (Photo Credit-IANS)

आज राज्यासह देशभरात लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेकजण आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी घराबाहेर पडत मतदान केंद्रावर हजेरी लावत आहेत. दिग्गजांसह सामान्य नागरिकही मतदान करताना दिसत आहे. त्यातच एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जगातील सर्वात कमी उंची असलेली महिला ज्योती आमगे (Jyoti Amge) हिने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्योतीच्या उंचीमुळे तिच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स (Guinness World Records) करण्यात आली आहे. ज्योतीची उंची 63 सेंटीमीटर आहे.

मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत ज्योतीने सांगितले की, "मी सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करते. कृपया मतदान करा आणि मग आपल्या कामाला लागा."

ANI ट्विट:

ज्योती आमगे हिने अमेरिकन आणि इटालियन टीव्ही सिरीजमध्ये अभिनय केला असून ती बिग बॉस 6 मध्येही झळकली होती. लोणावळ्याच्या सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये तिचा पुतळा देखील आहे.