Image For Representation (Photo Credits-Facebook)

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन  (NHAA) सुरू केली.  हेल्पलाइन आता संपूर्ण देशभरात टोल-फ्री क्रमांक “14566” वर  हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत चोवीस तास उपलब्ध आहे.

हेल्पलाइन क्रमांक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) [PoA] कायदा, 1989 ची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करेल आणि देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँड लाइन नंबरवरून व्हॉईस कॉल / VOIP करून संपर्क  करता येऊ  शकतो. अत्याचार प्रतिबंध कायदा अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी)  सदस्यांवरील अत्याचार रोखण्याच्या प्रमुख उद्देशाने लागू करण्यात आला होता.

हेल्पलाइनबद्दल मूलभूत माहिती :

  • टोल फ्री सेवा.
  • देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँड लाइन नंबरवरून "14566" वर व्हॉइस कॉल /VOIP करून संपर्क करता येऊ शकतो.
  • सेवांची उपलब्धता : चोवीस तास
  • सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असतील
  • मोबाईल ऍप्लिकेशन देखील उपलब्ध आहे.