कोल्हापूर: हातकणंगले मध्ये 69 गावठी बॉम्ब, स्फोटकांसह दोघा जणांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

कोल्हापूर पोलिसांनी 39 बॉम्ब आणि काही स्फोटकांसह 2 लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. हातकणंगले येथील माले मुडशिंगी मधील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून हे गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. तर हे बॉम्ब घरातच बनवले असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज्यात मतदानादिवशी एका हुबळी रेल्वे स्थानकाजवळ आलेल्या पार्सलमध्ये स्फोटकांचा स्फोट झाला होता. त्यामध्ये पोलिस तपासात त्यामध्येही कोल्हापूर कनेक्शन असल्याचं उघड झालं होतं.

हातकणंगले मध्ये पोलिसांना मिळालेल्या टीप मध्ये एका घरात गावठी बॉम्ब बनवले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यानंतर गावठी बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासोबतच पोलिसांना 69गावठी बॉम्ब सापडले. सोबतच सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे देखील सापडले. याचा वापर रानडुक्कराची शिकार करण्यासाठी केला जातो अशी प्राथमिक कबुली दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विलास जाधव अअणि आनंद जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

ANI Tweet  

सध्या पोलिसांकडून आनंद आणि विलास यांची कसून चौकशी सुरू आहे. बॉम्बची विक्री केली जाते का? उड्डाणपूलाखाली झालेल्या स्फोटामागे या बॉम्बचा काही संबंध आहे का? याचा तपास सुरू आहे.